The School of Language, Literature and Culture Studies was established in 2000 with the aim of promoting the study of language, literature and culture. It also aims to provide the students of this region with opportunities to recognize and face the challenges of globalization in their personal and public lives. At the School of Language, Literature and Culture Studies, we strive to enhance the students’ literary sensibilities and insights through interdisciplinary modes and methods inherent in the very concept of this School. During the past eighteen years, the School has remained a center of various literary activities. Various authors, learned scholars and professors have delivered lectures in the school constantly. From the beginning, the School has developed relations with other leading institutions in the field.
To generate interest in language and literature at higher levels of learning, the School has been conducting post graduate teaching effectively – organizing seminars, conferences, workshops, and conducting programs such as “Face to Face with a Writer. The school tries to give new and progressive direction to the research carried out in the fields of language, literature and culture.
Today, we are connected to the whole world through the internet, TV and other media. We encounter various languages and cultures every moment. Under such conditions, foreign languages can help us in understanding the world around us better, and can also encourage us to discover new horizons beyond our own borders. Languages can also help us to gain cultural understanding and cultivate a multi-cultural ethos. The objective of the departments of foreign languages is to help the students learn foreign languages, so that their own understanding of the world is enriched, and so that they may be better prepared to succeed in their chosen professions.
Training in foreign languages will help in meeting the increasing demand for competent communicators in the workplace and will help students to develop a variety of skills necessary in the professional world. Training in foreign languages will also help in fulfilling the increasing demand for graduates having a strong and broad base in cultural knowledge relevant to global changes in the age of information. The teachers at these departments practice the communicative approach of teaching foreign languages and make use of innovative teaching practices so that the students gain maximum benefit from the courses.
भाषा, वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुलाची स्थापना ही भाषा, वाड्मय व संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देण्याच्या हेतूने २००० मध्ये करण्यात आली. जागतिकीकरणाच्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देणे, हादेखील हेतू संकुलाचा आहे. संकुलाच्या संकल्पनेत अध्याहृत असलेल्या आंतरविद्याशाखीय स्वरूपातून विद्यार्थ्यांची वाड्मयीन संवेदनशीलता आणि अंतर्दृष्टी या संकुलाच्या माध्यमातून केली जाते. संकुल गेल्या अठरा वर्षांपासून विविध वाड्मयीन घडामोडींचे केंद्र राहिलेले आहे. विविध नामांकित लेखक, अभ्यासक आणि प्राध्यापकांना संकुलात व्याख्यानांसाठी पाचारण करण्यात येते. संकुलाने साहित्य व भाषेच्या क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांसोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत.
अधिक उन्नत स्तरावरील अभिरुची विकसित करण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रभावीपणे अध्यापन केले जाते; तसेच विविध राष्ट्रीय चर्चासत्रे, परिषदा आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत मराठी आणि इतर भाषांमधील विविध साहित्यिकांना निमंत्रित करण्यात येते. संकुलात भाषा, वाड्मय व संकृतीच्या क्षेत्रातील संशोधनाला नवी आणि प्रागतिक दिशा देण्याचे कार्य चालते.
आजच्या काळात आपण इंटरनेट, दूरदर्शन आणि सोशल मिडीया यांच्या माध्यमातून संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत. क्षणोक्षणी आपण विविध भाषा आणि संस्कृतींना सामोरे जात आहोत. अशा परिस्थितीत परकीय भाषांच्या माध्यमातून आपण आपल्या भोवतालचे जग अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो आणि आपल्या सीमेपलीकडील क्षितीजाचा शोध घेऊ शकतो. विद्यार्थ्याना परकीय भाषांमध्ये पारंगत करून त्यांची जग समजून घेण्याची पात्रता वाढविणे आणि त्यांनी निवडलेल्या व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वी होण्यात त्यांना तयार करणे, हा परकीय भाषा विभागांचा उद्देश आहे.
सक्षम संवादकर्त्यांची वाढती गरज भागविण्यासाठी परकीय भाषांची मदत होणार आहे. वेगवान जागतिक बदल घडणाऱ्या या माहिती युगाशी सुसंगत असे सांस्कृतिक ज्ञान प्राप्त करून मजबूत व व्यापक पाया असलेले पदवीधर निर्माण करणे आणि त्यासाठी आवश्यक अशा बहुविध कौशल्यांचा विकास साधणे, हे या विभागांचे उद्दिष्ट आहे. परकीय भाषांमधील अभ्यासक्रमांचा अधिकाधिक लाभ व्हावा या हेतूने या विभागातील अध्यापक हे अध्यापनात संवादी दृष्टीकोन आणि नाविन्यपूर्ण पद्धती वापरतात.