‘कोव्हिड-१९’ कोरोना योद्धांसाठी स्वारातीम विद्यापीठातर्फे दोन ‘निर्जंतुकिकरण वाहन’ सेवेत दाखल
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘कोव्हिड-१९’ कोरोना योद्धांसाठी म्हणजे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, नर्स, ब्रदर्स इत्यांदीना ‘कोव्हिड-१९’ कोरोना या संसर्गजन्य विषाणूपासून बचाव करण्यासाठी दोन ‘निर्जंतुकिकरण वाहन’ नांदेड शहरामध्ये सेवेत दाखल झाले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी आज रविवार, दि.१२ एप्रिल रोजी वाहनाचे उद्घाटन करून सेवेसाठी नांदेड शहरामध्ये पाठविली आहेत.
यावेळी कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.शिवराज बोकडे, नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.राजाराम माने, रुसा हर्बोमेडिसिन सेंटरचे समन्वयक डॉ.शैलेश वाढेर, डॉ.जी.बी.झोरे, जनसंपर्क अधिकारी डॉ.अशोक कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा मुंगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरामध्ये अनेक कोरोना योद्धे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या सकारात्मक भावनेतून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या कल्पनेतून या निर्जंतुकिकरण करणाऱ्या वाहने उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर वाहने शहरातून प्रत्येक ठिकाणी जाणार आहेत. त्याठिकाणी पॉइंटवर उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना या वाहनामध्ये दहा सेकंद सॅनिटायझर द्रव्याचा फवारा त्यांच्या सर्वांगावर पडणार आहे. जेणेकरून त्यांच्या कपड्यासहित सर्वांग निर्जंतुकिकरण होणार आहे.
कोव्हिड-१९ कोरोना या संसर्गजन्य विषाणूने जगभर मृत्यूचे थैमान घातले आहते. भारत व महाराष्ट्र ही याला अपवाद नाही. कोराना या संसर्गजन्य विषाणूच्या प्रतिकारासाठी केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन या सोबतच निमशासकीय आणि सामाजिक संस्थाही प्रयत्न करीत आहेत. कोव्हिड-१९ विरोधी लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वाहन देण्यात आलेले आहेत.
यासाठी विद्यापीठातील कर्मचारी व्यंकटराव हंबर्डे, शिवाजी हुंडे, शैलेश कांबळे, संतोष हंबर्डे हे परिश्रम घेत आहेत. यावेळी श्याम जाधव, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, गणपत लुटे, प्रीतम भराडिया, पांडुरंग सूर्यवंशी, जयकिशन बागडी, गोविंद सोनटक्के, निसार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.