स्वारातीम’ विद्यापीठाच्या वार्षिक अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी रु. ४२ कोटी १८ लक्ष तुटीचा अर्थसंकल्प सादर

स्वारातीम’ विद्यापीठाच्या वार्षिक अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी रु. ४२ कोटी १८ लक्ष तुटीचा अर्थसंकल्प सादर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प अधिसभेच्या बैठकीत एकमताने दुरुस्तीसह मंजूर करण्यात आला. अधिसभा सदस्य अशोक गुजराथी यांनी एकूण रुपये ३१४ कोटीचा अर्थसंकल्प अधिसभेसमोर सादर. ९ मार्च रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये सादर केला आहे. ४२ कोटी १८ लाख रुपयांच्या या तुटीचा अर्थसंकल्पास काही दुरुस्तीसह अधिसभेने मंजूर केला आहे. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रशांत पेशकार, डॉ. माधव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, नरेंद्र चव्हाण, नारायण चौधरी, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.पराग खडके, डॉ.चंद्रकांत बाविस्कर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, उपकेंद्राचे संचालक डॉ. संभाजी माने, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. भास्कर माने, आजीवन शिक्षण आणि विस्तार मंडळाचे संचालक डॉ. वैजनाथ अनमुलवाड, यासह अधिसभा सदस्य डॉ.दीपक बच्चेवार, डॉ.अशोक गवते, डॉ.दिलीप मुगळे, डॉ.संजय वाघमारे, डॉ.आशा मुंडे, धनराज जोशी, रामेश्वर पवार, डॉ.ए. टी. शिंदे, डॉ.विजय भोपाळे, डॉ.विष्णू पवार, डॉ.दिलीप पाईकराव, डॉ.अशोक टिपरसे, डॉ.एम. ए. बेंबडे, डॉ.वर्षा डोडीया, डॉ.बाबासाहेब सुरवसे, डॉ.दिलीपकुमार बोईनवाड, डॉ.शालिनी कदम, युवराज पाटील, डॉ.महेश मगर, अजय गायकवाड, गजानन आसोलेकर, शितल सोनटक्के, राजगोपाल कलानी, सिद्धेश्वर कासनाळे, दीपक मोरताळे, प्रमोद देशमुख, डॉ.सुभाष विखे, शिवाजी चांदणे आणि रंगनाथ शेळके आदींची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण कल्याण, कौशल्य विकास, संशोधनाला चालना आणि पायाभूत सुविधा विकास या प्रमुख बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच विद्यापीठ परिसराच्या आधुनिकीकरणासाठी विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण आर्थिक तरतुदी करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा उभारणीसाठी तब्बल ९ कोटी ११ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असून ही सर्वात मोठी तरतूद ठरली आहे. याशिवाय नवीन विद्यार्थी भवनासाठी १ कोटी रुपये, कमवा व शिका योजनेसाठी २० लक्ष, सॉफ्ट स्किल व व्यक्तिमत्व विकासासाठी २५ लक्ष, तर स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी २८ लक्ष रुपये देण्यात आले आहेत. कुलगुरू सहाय्यता निधी व विद्यार्थिनी दत्तक योजनेसाठी प्रत्येकी १५ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षासाठी ५ लाख रुपये, विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजनेकरिता १० लक्ष, विद्यार्थी विकास विभागांतर्गत पारितोषिक योजेनेकरिता २.५ लक्ष, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाडू पारितोषिकांसाठी रु.२० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय स्त्री अध्ययन केंद्रासाठी ९.५० लक्ष रुपये, महिला जागृती कार्यशाळांसाठी ५ लक्ष रुपये तसेच कर्मचारी प्रशिक्षण व कल्याणासाठी ३० लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचारी प्रशिक्षण व कल्याणासाठी ३० लक्ष रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या दीर्घकालीन विकासासाठी तयार करण्यात आलेल्या बृह आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी २ लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठातील संशोधन कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन प्रोत्साहन योजनेसाठी १५ लक्ष रुपये देण्यात आले आहेत. महाविद्यालये व विभागांमध्ये चर्चासत्रे आणि परिषदांसाठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षक व संशोधकांच्या संशोधन प्रकल्पांसाठी महाविद्यालय स्तरावर ७५ लक्ष आणि संकुल स्तरावर ३० लक्ष रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासाठी ३० लक्ष रुपये, तर महाविद्यालय गुणवत्ता वृद्धीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांसाठी परिषदा व संशोधन पेपर सादरीकरणासाठी रु.१५ लक्ष यासह प्रत्येक संकुलाकरिता परिषदा, कार्यशाळा चर्चासत्रे आयोजन करण्याकरिता किमान प्रत्येक संकुलाकरिता रु.३ लक्षची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या विस्तार आणि सुविधा वाढीसाठीही अर्थसंकल्पात भरीव निधी देण्यात आला आहे. परभणी उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी ५ कोटी रुपये, लातूर उपकेंद्राच्या वसतिगृह बांधकामासाठी ५ कोटी रुपये, तर हिंगोली न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये रस्ते व कंपाउंड बांधणीसाठी ४५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदीसाठी ५० लक्ष रुपये, तर परिसर हरितीकरणासाठी उद्यान विभागाला ८८.५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या विविध उपकेंद्रांच्या कार्यक्षमतेसाठी आवर्ती व अनावर्ती खर्चासाठीही निधी देण्यात आला आहे. लातूर उपकेंद्राला ३०४ लक्ष आवर्ती व १६९ लक्ष अनावर्ती, हिंगोली मॉडेल कॉलेजला १५४ लक्ष आवर्ती व ६० लक्ष अनावर्ती, परभणी उपकेंद्राला ७४ लक्ष आवर्ती व ४६ लक्ष अनावर्ती, तर किनवट संशोधन केंद्राला ५५ लक्ष आवर्ती व ४३ लक्ष अनावर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. तुटीचा असला तरी तो पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, संशोधन, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थी हिताच्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला आहे. आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागात उच्च शिक्षणाचा विस्तार करणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच येणाऱ्या एनआरआयएफ रँकिंगमध्ये स्थान