स्वारातीम विद्यापीठात संत गाडगे बाबा जयंती साजरी

स्वारातीम विद्यापीठात संत गाडगे बाबा जयंती साजरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज सोमवार, दि.२३ फेब्रुवारी, २०२६ रोजी संत गाडगे बाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहा.कुलसचिव रामदास पेद्देवाड, अनिरुद्ध रेह्गावकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधीक्षक के. डी. पाटील, डॉ.लक्ष्मीकांत आगलावे, हेमलता पाटील व शिवाजी चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.