विद्यापीठात ‘बालरंगभूमी व शिक्षणातील नाट्य’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन

विद्यापीठात ‘बालरंगभूमी व शिक्षणातील नाट्य’ विषयावर व्याख्यानाचे आयोजन प्रभावी शिक्षणाकरीता नाट्यकलेची उपयोगिता, व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने शिक्षणात नाट्यकलेचे वाढत जाणारे महत्व व निर्माण होणाऱ्या विविध व्यवसायाच्या संधीचा विचार करता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीनी कला संकुलाच्या नाट्य व चित्रपट विभागातर्फे दि.२५ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता क्वेस्ट, सोनाळे (Quality Education Support Trust) या संस्थेचे श्री निनाद उचले यांचे ‘बालरंगभूमी व शिक्षणातील नाट्य’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. क्वेस्ट हि संस्था मागील काही काळापासून ग्रामिण व अदिवासी शाळांतील मुलांमध्ये गुणवत्तापुर्ण शिक्षण व वाचन-लेखन, आणि सर्जनशील शिक्षण कार्यक्रम विकसित करण्यावर काम करते, या संस्थेचा मुख्य उद्देश आहे भाषिक साक्षरता व मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे. सदरील संस्था ही नाट्यकला व शिक्षण प्रक्रियेची सांगड घालण्याच्या अनुषंगानेही अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी ओळखली जाते, तसेच या संस्थेमार्फत दर वर्षी काही निवडक तरुण नाट्य कलावंताना ‘गोष्टरंग फेलोशीप’ प्रदान केली जाते. सदरील व्याख्यानादरम्यान गोष्टरंग फेलोशीपची निवड प्रक्रिया, कार्यपध्दती, सृजनशील कामांच्या संधी व लाभ आदींविषयी सविस्तर माहीती दिली जाणार आहे शहरातील तरुण, युवा नाट्य कलावंत, नाट्यसंस्था व शाळा-महाविद्यालयांमध्ये सृजनशील अध्यापनाचे काम करु इच्छीणाऱ्यांनी सदरील व्याख्यानाचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संयोजक, नाट्य व चित्रपट विभाग प्रा. राहुल गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॅा पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.