‘स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन

स्वारातीम’ विद्यापीठात नेट-सेट-गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएम-उषा यांच्या आर्थिक सहाय्याने आयोजित आठ दिवसीय नेट,सेट आणि गेट मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घाटन दि.११ मार्च रोजी विद्यापीठातील अधीसभा सभागृहामध्ये करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये अधिसभा सदस्य युवराज पाटील हे होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले की, केवळ नेट-सेट-गेट परीक्षा उत्तीर्ण होणे हेच अंतिम ध्येय नसून विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन यामुळे या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविता येते, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दिनेश जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयसर (IISER) पुणे, डॉ. ज्योती मोहिते, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे, प्रा. मधुसूदन पाटील, विद्यार्थी नेते अभिषेक कदम तसेच मार्गदर्शक व तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विद्या सुकेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुजाता कांबळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. बी. एस. सुकेरे, सहसंयोजक डॉ. ए. पी. पाठक, डॉ. संजय चव्हाण, डॉ. टी. ए. कदम, डॉ. एस. पी. चव्हाण, डॉ. एल. एन. काबळे यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.