
स्वारातीम विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज गुरुवार, दि.१२ मार्च, २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, डॉ. पी. विठ्ठल, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहा.कुलसचिव रवी मोहरीर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.