‘स्वारातीम” विद्यापीठात ‘सेक्युलरिझम’वर विशेष व्याख्यान

‘स्वारातीम” विद्यापीठात ‘सेक्युलरिझम’वर विशेष व्याख्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘राज्यघटनेतील सेक्युलरिझमचा अर्थ’ या विषयावर महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांचे विशेष व्याख्यान आयोजित होत आहे. हे व्याख्यान दि.२६ फेब्रुवारी, २०२६ रोजी दुपारी १२ वाजता विद्यापीठातील सामाजिकशास्त्र संकुलात होईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली. प्रा. शेषराव मोरे यांनी नुकतेच भारतीय संविधानातील सेक्युलरिझमवर ग्रंथ लिहिला असून, या व्याख्यानात त्यांचे मौलिक विचार ऐकण्याची दुर्मीळ संधी मिळेल. या व्याख्यानसत्राचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मनोहर चासकर असतील. प्र-कुलगुरू प्रा. अशोक महाजन आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले आहे.