स्वारातीम विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

स्वारातीम विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षामध्ये आज गुरुवार, दि.१९ फेब्रुवारी, २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, वित्त व लेखाधिकारी डॉ. राजेश शिंदे, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, गोविंद हंबर्डे, संदीप लुटे, जालिंदर गायकवाड, संभाजी धनमने व गोपिराज हंबर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध्याकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.